नवी दिल्ली – शेतकरी आंदोलन आणि कृषी कायद्यांशी संबंधित सर्व प्रकरणांवर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी पार पडत आहे. यादरम्यान न्यायालयाने केंद्र सरकारला फटकारले आहे. याप्रकरणी आम्ही सर्वच जण नाराज आहोत. काहीही चुकीचे झाल्यास आपण सर्व जबाबदार असू, असे सरन्यायाधीशांनी सुनावणीवेळी म्हंटले आहे.
मागील सुनावणीपासून शेतकऱ्यांशी चर्चा चालू असल्याचे केंद्र सरकार सांगत आहे. कोणती चर्चा सुरु आहे? सरकार ज्याप्रकारे चर्चा करत आहे त्यावर आम्ही खूपच निराश आहोत, अशा शब्दात सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी केंद्र सरकारला फटकारले आहे.
कायद्याची अंमलबजावणी काही काळासाठी सरकारने तहकूब करावी, असे आम्ही सांगितले होते. परंतु, सरकारने आमचे म्हणणे ऐकले नाही. काय अडचण आहे, कायद्याची अंमलबजावणी करण्यावर सरकार ठाम का आहे? असा प्रश्नही न्यायलयाने विचारला आहे.
Farm laws: CJI asks, can the implementation of laws be put on hold for the time being https://t.co/cf2mkANm6T
— ANI (@ANI) January 11, 2021
कृषी कायद्यांची स्तुती करणारी एकही याचिका आमच्याकडे आलेली नाही. शेतकऱ्यांच्या विषयाबद्दल न्यायालय तज्ज्ञ नाही. पण, तुम्ही या कायद्यांची अंमलबजावणी थांबवणार आहात की, आम्ही पावलं उचलायची? परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. लोकांचा मृत्यू होत आहे. थंडीत बसले आहेत. तिथे अन्नपाणी पाण्याची काय व्यवस्था आहे?, असेही न्यायालयाने सरकारला विचारले आहे.
Farm laws: Senior Advocate Dushyant Dave appearing for one of the farmers’ unions suggests that the matter be adjourned for tomorrow; requests the court to consider it https://t.co/m4e2vSrI2o
— ANI (@ANI) January 11, 2021