… अन्यथा आरपीआय राज्य सरकार विरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन करेल – रामदास आठवले

मुंबई  – महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे लेखन व भाषण खंडांचे प्रकाशन त्वरित सुरू न केल्यास राज्य सरकार विरोधात आरपीआय आंदोलन छेडणार असा इशारा केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी राज्य सरकारला दिला आहे.

केंद्रिय मंत्री आठवले म्हणाले की, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार देशालाच नव्हे तर संपूर्ण जगाला मार्गदर्शक आहेत. त्यांचे साहित्य भाषण आणि लेखन चे खंड प्रकाशित करण्यात महाविकास आघाडी सरकार दुर्लक्ष करीत आहे.

डॉ आंबेडकर लेखन व भाषण खंडाच्या 9 लाख प्रति प्रकाशित करण्यासाठी 5 कोटींचा खरेदी केलेला कागद धूळ खात पडला आहे.ही बाब अत्यंत निषेधार्ह आहे.डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे भाषण आणि लेखन खंडांचे साहित्य प्रकाशित करण्यात चालढकल केल्यास अधिक दिरंगाई केल्यास राज्य सरकार विरोधात रिपब्लिकन पक्ष रस्त्यावर उतरून आंदोलन करेल असा ईशारा आज रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज दिला आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.