…अन्यथा तेलाच्या किंमतींचा भडका उडेल

इराणच्या मुद्यावरून सौदीच्या राजांचा जगाला इशारा

नवी दिल्ली : सौदी अरेबियातील जगातील सर्वात मोठ्या तेल कंपनीवर ड्रोन हल्ले करण्यात आले होते त्याच पार्श्‍वभूमीवर आता सौदी अरेबियाचे राजे मोहम्मद बिन सलमान यांनी जगाला इशारा दिला आहे. इराणच्या मुद्द्यावर तोडगा काढण्यासाठी संपूर्ण जग एकत्र आले नाही, तर तेलाच्या किंमती भविष्यात कल्पनेपलीकडे भडकतील, असे सूचक विधान राजे मोहम्मद बिन सलमान यांनी केले आहे. त्याचवेळी या प्रश्नावर लष्करी कारवाई हा उपाय नसून, राजकीय पद्धतीने यावर तोडगा काढला पाहिजे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

मोहम्मद बिन सलमान यांनी जगाला सूचक इशारा देत, इराणला रोखण्यासाठी जर संपूर्ण जग एकत्र आले नाही आणि जगाने प्रयत्न केले नाहीत, तर हा विषय आणखी चिघळेल आणि त्यामुळे जगातील वेगवेगळ्या देशांना धोका निर्माण होण्याची शक्‍यता आहे. यामुळे तेलाच्या पुरवठ्यावर गंभीर परिणाम होईल. तेलाचा पुरवठाच कमी झाल्यामुळे त्याचे भाव कल्पनेपलीकडे वाढतील. आतापर्यंत कधीच बघितले नव्हते, अशा पातळीवर हे भाव जाऊन पोहोचतील, याकडे त्यांनी लक्ष वेधले आहे. जर भविष्यात इराण आणि सौदी अरेबिया यांच्या युद्ध भडकले, तर त्याचा जागतिक अर्थव्यवस्थेवर परिणाम होईल, असेही त्यांनी म्हटले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.