आले तर सोबत अन्यथा त्यांच्याविना

राठोड यांचा दिलीप गांधींवर निशाणा, आज नगर जिल्ह्यात सेनेचा माऊली संवाद

नगर – शिवसेनेने राज्यात माऊली संवाद आयोजित केला असून शिवसेना नेते आदेश बांदेकर यांच्या उपस्थितीमध्ये नगर जिल्ह्यामध्ये माऊली संवाद कार्यक्रम मंगळवारी,दि.24 दुपारी दोन वाजता नगर येथे होणार असल्याची माहिती शिवसेनेचे उपनेते व शहर प्रमुख दिलीप सातपुते यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.दरम्यान, माजी खासदार दिलीप गांधी यांच्या भुमिकेवर बोलताना राठोड यांनी सोबत आले तर बरोबर घेऊ नाही तर त्यांच्याविना असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.

शिवालयामध्ये आयोजित पत्रकार परिषदेस नगरसेवक श्‍याम नळकांडे, अमोल येवले, अशोक दहिफळे व शिवसेनेचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.
राठोड म्हणाले की माऊली संवाद राज्यभर सुरू आहे, नगर जिल्ह्यामध्ये शिवसेना नेते आदेश बांदेकर हे उद्या दि, 24 रोजी जिल्ह्यामध्ये येत असून सकाळी 11 वाजता श्रीरामपूर येथे तर दुपारी दोन वाजता नगर येथे दिल्लीगेट येथील भाजी मंडई मैदानामध्ये या संवादाचे आयोजन करण्यात आले आहे, तर सायंकाळी सहा वाजता पारनेर येथे या सोहळ्याचे आयोजन करण्यात आलेले आहे,महिलांचे प्रश्‍न, शिवसेनेबद्दलची भूमिका आदी विषय माउली संवादमध्ये घेतले जाणार आहेत नगर शहरातील महिला वर्गांनी या समाधान उपस्थित राहावे असे आवाहन सातपुते यांनी केले आहे.

माजी खासदार दिलीप गांधी यांनी राठोड यांना उमेदवारी दिली तर आम्ही प्रचार करणार नाही अशी भूमिका जाहीर केली होती त्याबाबत पत्रकारांनी राठोड यांना डेछले असता त्यांनी ते सोबत आले तर त्यांना घेऊन नाहीतर त्यांच्याविना अशी आमची भूमिका असल्याचेही राठोड यांनी स्पष्ट केले, जिल्ह्याचे पालकमंत्री राम शिंदे यांनी युतीच्या जागा वाटपाबाबत बदल होईल असे वक्तव्य केले होते ,यावरून उपनेते राठोड यांनी जागा वाटपाचा विषय हा वरिष्ठ पातळीवर म्हणजे मुंबई येथे होत असतो, पालकमंत्री राम शिंदे यांनी जी भूमिका मांडली ती त्यांची आहे की भाजपाची मला माहित नाही.

शिवसेनेत लोकशाही आहे ,लोकशाहीमध्ये सर्वांना उमेदवारी मागण्याचा अधिकार आहे त्यानुसार इतरांनी उमेदवारी मागितली असेल आम्ही एकाच विचाराचे आहोत, आमच्या मध्ये कोणते मतभेद नाही आम्ही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे तसे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे विचार घेऊन जात आहे, त्यामुळे आमच्या मध्ये कोणती ही विसंगती नाही असेही राठोड यांनी स्पष्ट केले.

उमेदवारीवरून आमच्यात हाणामाऱ्या नाहीत
उमेदवारी मागणीवरून राष्ट्रवादी, भाजप आदींमध्ये नेहमीच वाद-विवाद हाणामाऱ्या होत असतात तसे आमच्यामध्ये झाल्या नाहीत असे शहर प्रमुख दिलीप सातपुते यांनी यावेळी स्पष्ट केले.मात्र नगर शहरातून ज्यांनी सेनेची उमेदवारी मागितली ते कोणीच येथे उपस्थित नाही याकडे पत्रकारांनी लक्ष वेधले असता ते नगर शहरातच असे सांगून राठोड व सातपुते यांनी वेळ मारून नेली.

मुख्यमंत्र्यांना शहरात कुणाची ताकद ठाऊक
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे महाजनादेश यात्रेच्या संदर्भामध्ये नगर येथे आले असता त्यांचे आम्ही स्वागत केले व त्यांच्या समवेत काय बोलणे झाले असे विचारल्यावर मुख्यमंत्र्यांना नगर शहरातील प्रत्येकाची ताकद माहीत आहे असा खुलासाही त्यांनी यावेळी केला.

Leave A Reply

Your email address will not be published.