मार्केट यार्डात परप्रांतीय कामगारांना काम देण्याचा घाट

रिपब्लिकन फेडरेशनचा आरोप : स्थानिकांना वंचित ठेवण्याचा डाव

पुणे – मार्केट यार्डात परिसरातील स्थानिक नागरिकांना झाडू, दुकानांची साफसफाई, धान्य, फळे, इतर मालांची पॅकिंग करणे आणि सुरक्षा रक्षकांची कामे मिळावी यासाठी रिपल्बिकन फेडरेशन महाराष्ट्रच्या वतीने प्रयत्न करण्यात येत आहेत. मात्र, असे प्रयत्न करणाऱ्यांच्या विरोधात खोट्या तक्रारी देण्यात येत आहेत. श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड कामगार युनियन आणि बाजार समितीच्या काही अधिकाऱ्यांकडून स्थानिक ऐवजी परप्रांतीय कामगारांना काम देण्याचा घाट घालण्यात येत आहे. स्थानिकांना रोजगारापासून वंचित ठेवण्याचा हा डाव असल्याचा आरोप रिपलब्लिकन फेडरेशन महाराष्ट्रने केला आहे.

डाळींब यार्डात हमाल, कामगार आणि खरेदीदारांना यांना शिवीगाळ करून धमक्‍या देत असल्याचे म्हटले होते. त्यामध्ये चौघांचा नावाचा उल्लेख होता. मात्र, वास्तविक तसे नसून कामगार युनियनच्या तिघांवर गुन्हा दाखल आहे. त्यांच्याकडून व्यापारी आणि कामगारांना धमकाविण्यात येत आहे.

याबाबत फेडरेशनच्या वतीने बाजार समितीचे प्रशासक बी.जे.देशमुख यांना लेखी स्वरूपात निवेदन देण्यात आले आहे. त्यामध्ये कामगार युनियनचे सचिव संतोष नांगरे आणि इतर तिघांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे. याविषयी कामगार युनियनचे सचिव संतोष नांगरे म्हणाले, मूळातच मार्केट यार्डातील व्यापार बाहेर जाण्याचा परिस्थितीत आहे.त्या ठिकाणी शांततेच्या मार्गाने काम व्हावे, अशी आमची भूमिका आहे. आमचा कुणावरही आक्षेप नाही. कुणाला दुखावण्याचा उद्देश नाही. कोणाचेही नाव घेतलेले नाही.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here