उस्मानाबादेत हाय-व्होल्टेज लढत; राणा जगजितसिंह विरूध्द ओमराजे निंबाळकर

राष्ट्रवादीच्या राणा जगजितसिंह यांच्या विरोधात कट्टर विरोधक ओमराजे निंबाळकरांना सेनेकडून उमेदवारी

उस्मानाबाद – उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात या निवडणुकीत हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळणार असून एकाच घराण्यातील कट्टर विरोधक असणारे एकमेकांविरोधात पून्हा मैदानात उतरले आहेत. शिवसेनेने विद्यमान खासदार रवी गायकवाड यांचा पत्ता कापून डॉक्टर पद्मसिंह पाटील यांचे कट्टर विरोधक ओमराजे निंबाळकर यांना उमेदवारी दिल्याने राष्ट्रवादीनेही पद्मसिंह पाटील यांचे पुत्र आमदार राणा जगजितसिंह पाटील यांना मैदानात उतरवल्याने या लढतीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागणार आहे.

राज्यभर गाजलेल्या पवनराजे निंबाळकर हत्याकांडानंतर माजी गृहमंत्री राष्ट्रवादीचे आणि नेते डॉ. पद्मसिंह पाटील यांना अटक करण्यात आली. ओमराजे निंबाळकर हे पवनराजे निंबाळकर यांचे पुत्र असून युवा सेनेचे ते राज्य सचिव आहेत. ‘मातोश्री’चे त्यांच्यावर आशीर्वाद आहेत. पवनराजे निंबाळकर हत्याकांडानंतर उस्मानाबाद जिल्ह्यात डॉ. पाटील आणि ओमराजे निंबाळकर असा सत्तासंघर्ष सुरू झाला असून तो आजही सुरूच आहे. याच संघर्षातून ओमराजे निंबाळकर यांनी डॉ. पाटील यांचा तेरणा साखर कारखानासह विधानसभा निवडणुकीत दारुण पराभव करत डॉ. पाटील यांच्या सत्ता साम्राज्याला सुरुंग लावला होता. कोणत्याही निवडणुका असल्या की हा संघर्ष अटळ असतो.

2009 च्या विधानसभा निवडणुकीत ओम राजेनिंबाळकर यांनी राणा जगजितसिंह पाटील यांचा पराभव केला होता तर 2014 च्या विधानसभा निवडणुकी आमदार राणा पाटील यांनी या पराभवाची परतफेड करून विजय मिळवला होता.

आता हे दोन्ही उमेदवार एकमेकांच्या विरोधात पुन्हा उभे राहिल्याने रंगदार लढत होणार आहे. या मतदार संघात राष्ट्रवादीला काँग्रेसची साथ कितपत लाभणार यावरच निकाल अवलंबून असल्याचे सध्या तरी दिसत आहे

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)