Oscars 2025 winner list | अमेरिकेच्या लॉस एंजेलिसमध्ये ऑस्कर पुरस्कार सोहळा पार पडला. यावर्षीच्या पुरस्कारात सेक्स वर्करची गोष्ट असलेल्या ‘अनोरा’ चित्रपटाचा दबदबा पाहायला मिळाला. 97व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात या चित्रपटाला पाच कॅटेगरीजमध्ये पुरस्कार मिळाले आहेत. यात सर्वोत्कृष्ट चित्रपट, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्री या पुरस्कारांचा समावेश आहे.
गुनीत मोंगा व प्रियांका चोप्राची सह-निर्मिती असलेल्या सर्वोत्कृष्ट लाइव्ह अॅक्शन शॉर्ट फिल्म ‘अनुजा’ला देखील नामांकन मिळाले होते. मात्र, हा चित्रपट पुरस्कारापर्यंत पोहोचू शकला नाही. माईकी मॅडिसनला ‘अनोरा’साठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा तर एड्रियन ब्रॉडीला ‘द ब्रूटलिस्ट’मधील भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला.
ऑस्कर विजेत्यांची संपूर्ण यादी (Oscars 2025 Full Winners List)
- सर्वोत्कृष्ट चित्रपट – अनोरा
- सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक – शॉन बेकर (अनोरा)
- सर्वोत्कृष्ट अभिनेता – एड्रियन ब्रॉडी (द ब्रूटलिस्ट)
- सर्वोत्कृष्ट अभिनेत्री – माइकी मॅडिसन (अनोरा)
- सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता – किरन कल्किन, ‘अ रियल पेन’
- सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री – जोई सल्डाना (इमिलिया पेरेझ)
- सर्वोत्कृष्ट मूळ पटकथा – अनोरा
- सर्वोत्कृष्ट रूपांतरित पटकथा – कॉनक्लेव्ह
- सर्वोत्कृष्ट एनिमेटेड चित्रपट – फ्लो
- सर्वोत्कृष्ट डॉक्यूमेंट्री फीचर – नो अदर लँड
- सर्वोत्कृष्ट डॉक्यूमेंट्री शॉर्ट – द ओनली गर्ल इन द ऑर्केस्ट्रा
- सर्वोत्कृष्ट लाइव्ह-अक्शन शॉर्ट – आय एम एम नॉट ए रोबोट
- सर्वोत्कृष्ट अनिमेटेड शॉर्ट – इन द शॅडो ऑफ साईप्रस
- सर्वोत्कृष्ट ओरिजिनल स्कोर – द ब्रूटलिस्ट
- सर्वोत्कृष्ट ओरिजिनल साँग – एल मल, एमिलिया पेरेझ ((Clément Ducol, Camille, and Jacques Audiard)
- सर्वोत्कृष्ट साउंड – ड्यून: पार्ट 2
- सर्वोत्कृष्ट प्रोडक्शन डिझाइन – विक्ड
- सर्वोत्कृष्ट छायाचित्रण – द ब्रूटलिस्ट
- सर्वोत्कृष्ट हेअर आणि मेकअप – द सबस्टेंस
- सर्वोत्कृष्ट फिल्म एडिटिंग – अनोरा
- सर्वोत्कृष्ट व्हिज्युअल इफेक्ट्स – ड्यून: पार्ट 2
- सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपट – आय एम स्टिल हियर (ब्राझील)