मुंबई – कलाक्षेत्रातील प्रत्येक अभिनेत्याचे जगातील प्रतिष्ठित अश्या ‘ऑस्कर’ पुरस्कारांकडे लक्ष लागलेले असते. यंदाचा हा दिमाखदार सोहळा 25 एप्रिल 2021 रोजी अमेरिकेतल्या लॉस एँजेलिसमध्ये पार पडणार आहे. या सोहळ्याचं यंदाचं 93 वे वर्ष आहे.
यंदा ऑस्कर आंतरराष्ट्रीय चित्रपट श्रेणीसाठी भारतातून मल्याळी भाषेतील ‘जल्लीकट्टू’ या चित्रपटाची निवड केली गेली होती. मात्र ‘जलिकट्टू’ हा चित्रपट ऑस्करच्या शर्यतीतून बाहेर पडला असला तरीदेखील ‘बिट्टू’ या लघुपटाने बाजी मारली आहे. या लुघपटाने पहिली फेरी पार केली आहे. त्यामुळे आता तो लाईव्ह अॅक्शन फिचर फिल्म या विभागात नामांकन मिळवण्यासाठी प्रयत्न करणार आहे. ऑस्करसाठी भारताकडून ‘बिट्टू’ हा लघुपट पाठवण्यात आला होता. विशेष म्हणजे या चित्रपटाची निर्मिती एकता कपूरने केली आहे.
करिष्मा दुबे दिग्दर्शित या लघुपटाची पटकथा आणि अभिनय सरस ठरल्यामुळे हा लघुपट या स्पर्धेत लोकप्रिय ठरला आहे. या फिल्ममध्ये आरोही पटेल, मेहुल सोलंकी, हेमांश शाह आणि मौलिक नायक यासारखे कलाकार झळकले आहेत. तर एककीकडे ‘जल्लीकट्टू’ हा केरळच्या एका पारंपरिक खेळावर आधारित चित्रपट आहे.