‘मोतीबाग’ला ऑस्कर नामांकन

या वर्षीची ऑस्कर नामांकने जाहीर व्हायला आता सुरुवात होते आहे. उत्तराखंडमधील शेतकऱ्यांची कथा असलेला मोतीबाग या लघुपटाला ऑस्कर नामांकन मिळाले आहे. हा सिनेमा म्हणजे शेतकऱ्यांच्या समस्येवरील माहितीपट किंवा शॉर्ट फिल्म म्हणता येईल.

कौडी गडवाल जिल्ह्यातल्या साकुडा या छोट्याशा गावातल्या विद्या दत्त शर्मा या 83 वर्षीय शेतकऱ्याची ही कथा आहे. जेमतेम तासभराच्या या शॉर्ट फिल्ममध्ये शेतकऱ्यांच्या अनेक समस्या दाखवल्या आहेत. वस्तुस्थितीचे यथार्थ दर्शन घडवल्यामुळेच “मोतीबाग’ला ऑस्करचे नामांकन मिळाले आहे. शेतीपुढील समस्यांमुळे युवकांनी गाव सोडून शहराकडे जाऊ नये, असा संदेश या शॉर्ट फिल्मनमधून दिला गेला आहे. या शॉर्ट फिल्ममुळे गावातील शेतकरी शहराकडे जाण्याचे प्रमाण कमी होईल, अशी आशा उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली आहे. भारतातून यावर्षी ऑस्करचे नामांकन जाहीर होणारा “मोतीबाग’ हा पहिलाच लघुपट आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.