मुंबई- कलाक्षेत्रातील प्रत्येक अभिनेत्याचे जगातील प्रतिष्ठित अश्या ‘ऑस्कर’ पुरस्कारांकडे लक्ष लागलेले असते. यंदाचा हा दिमाखदार सोहळा 25 एप्रिल 2021 रोजी अमेरिकेतल्या लॉस एँजेलिसमध्ये पार पडणार आहे. या सोहळ्याचं यंदाचं 93 वे वर्ष आहे.
यंदा ऑस्कर आंतरराष्ट्रीय चित्रपट श्रेणीसाठी भारतातून मल्याळी भाषेतील ‘जल्लीकट्टू’ या चित्रपटाची निवड केली गेली आहे. या चित्रपटाने ऑस्कर निवडीपूर्वी भारतीय आणि विदेशी चित्रपट महोत्सवात अनेक पारितोषिके मिळविली आहेत. 4 ऑक्टोबर 2019 मध्ये केरळ राज्यात हा चित्रपट रिलीज झाला होता.
INDIA’S OFFICIAL ENTRY TO #OSCARS… #Malayalam film #Jallikattu will be #India’s official entry to the 93rd Academy Awards 2021 #Oscars. pic.twitter.com/qxPpfvT83a
— taran adarsh (@taran_adarsh) November 25, 2020
‘जल्लीकट्टू’ हा केरळचा एक पारंपरिक खेळ आहे. केरळच्या इडुक्की जिल्ह्यातील ‘जल्लीकट्टू’ या वादग्रस्त खेळावर आधारित या चित्रपटाची कथा आहे. या खेळाच्या नियमांनुसार बैलाला ठार मारण्यापूर्वी गर्दीत सोडले जाते. आणि त्यानंतर बैलाला पडण्यामागचे प्रयत्न या चित्रपटात दाखविण्यात आले आहे.
कलाकारांची मेहनत, अभिनय कलेने गाठलेली एक वेगळी उंची आणि तंत्रज्ञानाचा वापर करत अधिक बहरलेली ही चित्रपट साकारण्याची कला नेमकी किती उंची गाठू शकते याची अनुभूती ऑस्कर पुरस्कारात दिसून येत. दरम्यान, चित्रपट निवड समितीने ऑस्कर साठी अन्य भाषातील 27 चित्रपटाचा विचार केला आहे.