न्यूयॉर्क : जागतिक स्तरावर चित्रपटसृष्टीतील सर्वात मानाचे पुरस्कार म्हणून ‘ऑस्कर पुरस्कार’ ला ओळखले जात. या मानाच्या पुरस्काराकडे जगातील अवघ्या मनोरंजन विश्वाची नजर लागून असते. दरम्यान यंदाचा ऑस्कर सोहळा देखील आज पार पडला. मात्र या सोहळ्याला एका घटनेमुळे काहीसे गालबोट लागले आहे.
सुपरस्टार विल स्मिथ आणि ख्रिस रॉक यांच्या 2022 च्या ऑस्कर टेलीकास्ट दरम्यान काहीसा वाद पाहायला मिळाला. ख्रिस रॉक स्टेजवर डॉक्यूमेंटरी फीचरसाठी ऑस्कर पुरस्कार देण्यासाठी आला होता. यावेळी ख्रिस रॉकने विल स्मिथची पत्नी जॅडा स्मिथ हिच्याबाबत प्रतिक्रिया दिली. पण ही मस्करी स्मिथला सहन झाली नाही आणि त्याने थेट स्टेजवर जात रॉक यांच्या कानशिलात लगावली.
रॉकने G.I Jane 2 या चित्रपटाबाबत बोलताना स्मिथची पत्नी जॅडा पिंकेट स्मिथची मस्करी केली होती. यावेळी तो जॅडाच्या डोक्यावर कमी केस असल्यामुळे तिला हा चित्रपट मिळाला होता, अशी कमेंट केली होती. यावरुन विल भडकला आणि त्याने रॉकच्या कानाखाली लगावली.
Here’s the moment Chris Rock made a “G.I. Jane 2” joke about Jada Pinkett Smith, prompting Will Smith to punch him and yell, “Leave my wife’s name out of your f–king mouth.” #Oscars pic.twitter.com/kHTZXI6kuL
— Variety (@Variety) March 28, 2022
मूळात जॅडा हीचे कमी केस हे कोणतीही स्टाईल नसून ती Alopecia नावाच्या टकल पडण्याच्या एका आजारामुळे त्रस्त आहे. त्यामुळे तिच्या डोक्यावर केस नसून अशामध्ये तिची केलेली मस्करी विलला अजिबात भावली नसल्याने त्याने अशाप्रकारे रॉकच्या कानशिलात लगावली आहे. विलने अशाप्रकारे रॉकच्या कानशिलात लगावल्यानंतर तेथील उपस्थित सर्वचजण आश्चर्यचकीत झाले.
ख्रिसने यावेळी पुन्हा माझ्या पत्नीचं नाव नको घेऊस असा दम रॉकला भरला तर रॉकनेही यावेळी त्याला असं करणार नाही अशी हमी दिली. पण हा सारा प्रकार पाहून तेथे उपस्थितांसह टीव्हीवर पाहणारे प्रेक्षक देखील शॉक झाले. विशेष म्हणजे या घटनेनंतर विल आणि रॉक दोघेही ट्रेंड होऊ लागले. सोशल मीडियावर हा व्हीडीओ आणि घटना तुफान व्हायरल होऊ लागली आहे.