तांडव सुरु! देशात २४ तासांत अडीच लाखांच्या पुढे कोरोनाबाधितांची नोंद; दीड हजार मृत्यू

नवी दिल्ली : देशात करोनाचा वाऱ्यासारखा पसरत आहे. देशातील परिस्थिती दिवसेंदिवस चिंताजनक होताना दिसत आहे. अचानक वाढलेल्या रुग्णसंख्येमुळे आरोग्य व्यवस्थेवर प्रचंड ताण येत असतानाच देशात नव्या विश्वविक्रमी रुग्णसंख्येची नोंद झाली आहे. यातही धक्कादायक गोष्ट म्हणजे देशातील मृत्यूंची संख्याही झपाट्याने वाढली आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार देशात गेल्या २४ तासांत २ लाख ६१ हजार ५०० करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर याच कालावधीत १ लाख ३८ हजार ४२३ रुग्ण करोनावर मात करून घरी परतले आहेत. देशासाठी चिंतेची बाब म्हणजे मृतांच्या संख्येत २४ तासांतच मोठी वाढ झाली आहे. देशात १ हजार ५०१ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील एकूण मृतांची संख्या १ लाख ७७ हजार १५० वर पोहोचली आहे.

पहिल्या लाटेपेक्षा करोनाची दुसरी लाट भयानक आहे. युके, दक्षिण, ब्राझील या देशात आढळून आलेल्या करोनाच्या नव्या स्ट्रेनसह डबल म्युटेशनही भारतात आढळून आलं असून, त्यामुळे परिस्थिती दिवसागणिक गंभीर होत चालली आहे. देशात करोना संक्रमण वेगानं वाढत असून दररोज विक्रमी रुग्णसंख्या नोंदवली जात आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आज जाहीर केलेल्या रुग्णवाढीच्या आकडेवारीने आतापर्यंतचे २४ तासांत आढळून आलेल्या रुग्णसंख्येचे सर्व विक्रम मोडीत काढले आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.