बारामतीत म्युकरमायक्रोसिस तपासणी शिबिराचे आयोजन

राज्यातील पहिला उपक्रम

बारामती  – नटराज नाट्य कला मंडळ बारामती व इंडियन डेंटल असोसिएशन बारामती- फलटण शाखा यांच्या वतीने म्युकरमायक्रोसिस रोगनिदान उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.महाराष्ट्रातील पहिले म्युकरमायक्रोसिस तपासणी शिबीर असल्याचे ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर यांनी सांगितले.

बारामती तालुका शहर यामधील कोरोना आजार होऊन गेलेल्या रुग्णांची म्युकरमायक्रोसिस या रोगा बाबत ची तपासणी इंडिय न डेंटल असोसिएशन बारामती फलटण ब्रांच यांच्या वतीने राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त डॉ विश्वजित निकम व सहकारी बुधवार दि( 19) मे रोजी दुपारी 3 ते सायंकाळी ६ या वेळेमध्ये नटराज नाट्य कला मंदिर, तीन हत्ती चौक बारामती येथे करण्यात येणार आहे.

ज्यांना कोरोना आजार होऊन गेला आहे अशा नागरिक बंधू-भगिनी, मुले यांनी या आजाराची संभाव्य धोका टाळण्यासाठी तपासणी करून घ्यावी. सदरची तपासणी तज्ञ डॉक्टरांकडून विनामूल्य केली जाणार आहे तपासणीवेळी येताना आपल्यावरील झालेल्या उपचाराचे पेपर्स असतील तर सोबत आणावे आले नंतर सोशल डिस्टंसिंग नियमानुसार प्रवेश थांबणे व तपासणी केली जाईल अशी माहिती किरण गुजर यांनी दिली दिली

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.