टाकळी खंडेश्‍वरीत मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन 

कर्जत  – कर्जत तालुक्‍यातील टाकळी खंडेश्‍वरी येथे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या वाढदिवसानिमित्त कर्जत तालुका कॉंग्रेस कमिटीच्या वतीने मॅरेथॉन स्पर्धा झाल्या. जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रताप शेळके यांनी झेंडा दाखवून स्पर्धेचा प्रारंभ केला.

चिंचोली फाटा येथील स्वानंद विद्यालयात बाळासाहेब साळुंके यांच्या अध्यक्षतेखालील कार्यक्रमात बक्षीस वितरण झाले. थोरात यांच्या वाढदिवसानिमित्त तालुक्‍यात सलग सात दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तालुकाध्यक्ष किरण पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रवीण घुले, स्वानंद शिक्षण संस्थेचे सचिव बापूसाहेब काळदाते, तात्यासाहेब ढेरे,गटविकास अधिकारी अमोल जाधव, भाऊसाहेब तोरडमल, किशोर तापकीर, बाळासाहेब सपकाळ, तात्यासाहेब ढोबे, अमोल ढोबे, जाकिर सय्यद, सतीश पाटील, आबा फरताडे,क्रीडा शिक्षक हिंमत खडके, सुहास भोसले, आण्णासाहेब काळदाते व स्पर्धक उपस्थित होते.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.