50 टक्के सवलतीच्या दरात आटा चक्की

उपमुख्यमंत्रांच्या वाढदिवसानिमित्त चैतन्य एजन्सीचा नावीन्यपूर्ण उपक्रम

बारामती : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत येथील चैतन्य एजन्सीजच्या वतीने नावीन्यपूर्ण उपक्रमाचे आयोजन केले आहे. चैतन्य एजन्सीच्या वतीने ५० टक्के सवलतीच्या दरात आटाचक्की चे वाटप केले जात आहे. नागरिकांचा देखील या उपक्रमाला प्रतिसाद मिळत आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा वाढदिवस संपूर्ण राज्यात साजरा होतो. वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण रक्तदान शिबीर तसेच विविध सामाजिक संस्थांच्या माध्यमातून अनेकांना मदतीचा हात दिला जातो. याच भावनेतून चैतन्य एजन्सी द्वारे हा उपक्रम राबविण्यात येत आहे. सर्वसामान्यांना ५० टक्के सवलतीच्या दरात आटा चक्की तसेच वॉटर प्युरिफायर दिला जात आहे.

शहरातील भिगवन रोड लगत असलेल्या श्रीराम उद्योग भवन येथे या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष किशोर मासाळ यांच्या मार्गदर्शनातून हा उपक्रम राबविण्यात आला आला असल्याचे चैतन्य एजन्सीचे नितीन मासाळ यांनी स्पष्ट केले.या उपक्रमाच्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांना सवलतीच्या दरात आटा चक्की व वॉटर प्युरिफायर मिळत असल्याने नागरिकांचा प्रतिसाद या योजनेला मिळाला आहे. १५ ऑगस्टपर्यंत ही योजना सुरू असल्याचे मासाळ यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.