बैलगाडा शर्यतींचे आयोजन; पाच जणांवर गुन्हा

मंचर -अवसरी बुद्रुक (ता. आंबेगाव) येथील घाटात बैलगाडा शर्यतीचे आयोजन केल्याप्रकरणी संबधितांच्या विरोधात मंचर पोलिसांनी कारवाई करून गुन्हा दाखल केला आहे.

शुक्रवारी (दि. 30) अवसरी बुद्रुकच्या हद्दीत बैलगाडा घाटात बैलगाडा मालक धोंडीभाऊ बबन आरुडे (वय 40, रा. खेड), संतोष शिवाजी बिरदवडे (वय 42, रा. खराबवाडी चाकण), संकेत कुंडलिक मैद (वय 23, रा. चास),

अभिमन्यु योगेश ढमाले (वय 20, रा. कडूस), केतन मारुती शुक्‍ले (वय 24, रा. दोंदे) या सर्वांवर मंचर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस जवान गणेश डावखर करीत आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.