पुणे – हवामानशास्त्रातील नवीन माहिती मिळवण्यासाठी आणि त्याचा शेती आणि रोजच्या जीवनातील उपयोगासाठी भारतीय हवामानशास्त्र विभागाकडून पुण्यात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
येत्या 21 डिसेंबर रोजी म्हणजेच शनिवारी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात हवामानशास्त्राचा शेतीमध्ये कसा उपयोग करता येईल? शेतीसाठी मोबाईल ऍप्लिकेशन्स त्यासोबतच नवीन प्रकाशने आणि अहवालाचे प्रदर्शन देखील भरवण्यात येणार आहे. त्यासोबतच या कार्क्रमात विविध क्षेत्रातील तज्ज्ञ, संशोधक, विद्यार्थी, शेतकरी आणि धोरणकर्ते, संबंधित विज्ञानातील नवीन प्रगतीवर चर्चा करण्यासाठी एकत्र येणार आहेत.
कर्यक्रमाचे आयोजन भारतीय हवामानशास्त्र सोसायटी (IMSP), हवामानशास्त्र विभाग (IMD), भारतीय उष्णदेशीय हवामान विज्ञान संस्था (IITM), प्रगत संगणन विकास केंद्र (C-DAC), सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (DASS-SPPU), MPKV राहुरी, कृषी महाविद्यालय, शिवाजीनगर, पुणे, भारतीय रिमोट सेन्सिंग सोसायटी (ISRS) पुणे शाखा आणि भारतीय भूगणितीय सोसायटी (ISG) पुणे शाखा यांच्याकडून करण्यात आले आहे. तर पुण्यातील शिवाजीनगरच्या श्रीमाने हॉल,कृषी महाविद्यालयात हा कार्यक्रम पार पडणार आहे. तर या कार्यकर्मासाठी प्रवेश शुल्क 200 रुपये एवढा आकारण्यात येणार आहे. (कार्यक्रम स्थळी किंवा online भरता येईल ).