पेरणे : शिरूर – हवेलीचे आमदार अशोक पवार यांच्या वाढदिवसानिमित्त ” संकल्प विकासाचा ,गजर हरिनामाचा” आरंभ भव्य भजन स्पर्धेचे आयोजन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश वरिष्ठ सरचिटणीस प्रदिप वसंत कंद तसेच स्वाभिमानी – जनशक्ती विचार मंच लोणीकंद यांच्या वतीने करण्यात आले आहे. . या स्पर्धेचा शुभारंभ शनिवार दि .२८ रोजी सकाळी १० वाजता , पेरणे फाट्याजवळील सिद्धेश्वर पॅलेस कार्यालयामध्ये महाराष्ट्र राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात व आमदार अशोक पवार यांच्या ऑनलाईन उपस्थितीत सुरू झाली.
या स्पर्धेस शिरूर – हवेली मतदार संघातून उत्स्फुर्तपणे व भव्य प्रतिसाद मिळाला आहे . या स्पर्धेचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, आमदार अशोक पवार , राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश वरिष्ठ सरचिटणीस प्रदीप वसंतराव कंद, पुणे जिल्हा विद्यार्थी चे उपाध्यक्ष सागर तळेकर, हवेली तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष दिलीप वाल्लेकर महिला राष्ट्रवादी अध्यक्ष लोचन शिवले, पंचायत समिती सदस्या संजीवनी कापरे , युवक राष्ट्रवादी अध्यक्ष योगेश चितळे, हवेली तालुका विद्यार्थी अध्यक्ष सनी कारभोळ, पुणे जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष राजेंद्र वारघडे,पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे चिटणीस शाम खलसे, पुणे जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष विजय वाळुंज,
तुळापूरचे माजी सरपंच गणेश पुजारी, महिला उपाध्यक्ष हवेली तालुका माधुरी वाळके,पत्रकार सुखदेव भोरडे, सचिन धुमाळ, प्रमोद लांडे,अमोल दरेकर ,गजानन गव्हाणे, उदयकांत ब्राम्हणे,बकोरी माजी सरपंच शांताराम कोलते,लोणीकंद चे माजी उपसरपंच श्रीमंत झुरुंगे,फुलगाव चे माजी उपसरपंच कांताराम वागस्कर, नवनाथ वागस्कर,ग्रामपंचायत सदस्य लोणीकंद रुपेश गावडे, सागर झुरुंगे, रुपेश कंद,पैलवान किरण साकोरे व इतर पत्रकार मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. याप्रसंगी पत्रकारांचा पाच लाख रुपयांचा विमा काढण्यात आला.
सेवा समिती संस्थापक अध्यक्ष चंद्रकांत वारघडे यांनी दिवसभर उपस्थिती लावीत भजनी मंडळांना प्रोत्साहन दिले पुणे जिल्हाध्यक्ष लक्ष्मण गव्हाणे यांनी कार्यक्रमास उपस्थिती लावत भजनाचा आनंद घेतला.
भजन स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकास एकवीस हजार , द्वितीय क्र. पंधरा हजार , तृतीय अकरा हजार तीनही क्रमांकास सन्मानचिन्ह बक्षीस म्हणून देण्यात येणार आहे . तर उत्कृष्ठ पखवाद तबला वादक एकवीशे एक , उत्कृष्ठ पेटीवादक एकवीशे एक , उत्कृष्ठ वेशभूषा सादरीकरण व शिस्तबद्ध भजनी मंडळास तीनहजार एकशे एक असे पारितोषिक देण्यात येणार आहे . या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ ३० ऑगस्ट ना रोजी कोरोना योध्यांच्या हस्ते होणार असल्याचे प्रदीप कंद यांनी सांगितले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमोल दरेकर यांनी मानले.
या भव्य भजन स्पर्धेसाठी शिरूर – हवेली मतदार संघातील भजनी मंडळ मोठ्या प्रमाणत सहभागी होणार आहेत. या स्पर्धेत मोठ्या बक्षिसासह, भजनी मंडळांना प्रवास खर्च, चहा, अल्पोपहार,भोजन व्यवस्थेसह भव्यदिव्य आयोजन व नियोजन केल्याने भजनी मंडळी त्यास उत्स्फूर्त प्रतिसाद देताना दिसत आहे . कोरोणाच्या सर्व निर्बंध कटाक्षाने पाळण्यात येणार आहेत.
दोन वर्षे झाले वारकऱ्यांना वारी नाही यासाठी विठू माऊलीच्या लेकरांना भजन नामस्मरणाने पुन्हा विठ्ठल अनुभूती मिळावी व आमदार अशोक पवार यांनी विकासाची चंद्रभागा शिरूर – हवेलीतील नागरिकांपर्यंत पोचविण्याचे काम करत आहेत त्यांच्या सन्मानासाठी , दीर्घायुष्यासाठी या भजन स्पर्धा आयोजित केल्या आहेत .त्याविषयीचा आदर व सन्मान म्हणून भजन स्पर्धांचे आयोजन केले आहे.
प्रदीप वसंतराव कंद ,राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश वरिष्ठ सरचिटणीस