पुणे – गेल्या काही महिन्यांपासून संपूर्ण राज्यभर एका नावाची खूप चर्चा आहे. ते नाव म्हणजे ‘गौतमी पाटील’. दुकानाचं उदघाटन असो वा एखाद्याचा जन्म दिवस गौतमीच्या कार्यक्रमाशिवाय सेलिब्रेशन पुढे जातच नाही.
गौतमीचा कार्यक्रम म्हणजे मोठी पब्लिसिटी, मोठी गर्दी आणि मोठा खर्च. कॉलेजवयीन तरुणाईपासून ते नोकरदार वर्गापर्यंतच्या प्रत्येकाला गौतमीच्या नृत्याची भुरळ पडते.
सध्या गौतमी पाटीलच्या कार्यक्रमांचा सर्वत्र बोलबाला आहे. त्यामुळेच गौतमीच्या कार्यक्रमांच्या तारखा मिळणं देखील मुश्किल आहे. गौतमी पाटील आणि गर्दी हे समीकरण सध्या बनले असून,
दरम्यान, गौतमीची क्रेझ एवढी वाढलीय की आता तर काही मंडळी स्वत:च्या घरगुती कार्यक्रमाला देखील गौतमी पाटीला बोलवताना दिसत आहे. परंतु आयोजकांना हा कार्यक्रम चांगलाच महागात पडला असल्याचं नुकतंच दिसून आलं आहे.
झालं असं की., नुकतंच चाकणच्या मोई येथे विद्यमान आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त गौतमी पाटीलचा कार्यक्रम आयोजित केला होता. गौतमीच्या कार्यक्रमाला पोलिसांनी परवानगी नाकारली होती. त्यानंतरही आयोजकांनी कार्यक्रम घेतला होता.
यामुळे आयोजक समीर गवारे, आनंद गवारे आणि विश्वनाथ गवारे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल केला असून, अनेकांच्या यामुळे अडचणी वाढल्या आहेत.