पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने ‘जल्लोष शिक्षणाचा 2024’ चे आयोजन

पिंपरी – महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक, सांस्कृतिक व इतर कलागुणांना वाव मिळावा, यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने ‘जल्लोष शिक्षणाचा 2024’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम 23 व 24 जानेवारी रोजी बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे होणार आहे. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी बनविलेल्या वस्तुंचे प्रदर्शन, माजी विद्यार्थ्यांचे अनुभव कथन, उत्कृष्ट कामगिरी करणार्या शाळांचा आणि विद्यार्थ्यांचा सन्मान तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचासमावेश असणार आहे.
याबाबत माहिती देताना आयुक्त शेखर सिंह म्हणाले, हा कार्यक्रम महापालिकेच्या शाळांमधील शिक्षणाचा दर्जा वाढविण्याबरोबरच विद्यार्थ्यांसाठी सकारात्मक परिणाम घडवून आणेल अशी आशा आहे. जल्लोष शिक्षणाचा या उपक्रमाद्वारे महापालिका शाळांमध्ये सकारात्मक आणि प्रेरणादायी वातावरण तयार होण्यास मदत होत असून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळत आहे.
अतिरिक्त आयुक्त प्रदिप जांभळे पाटील म्हणाले, हा उपक्रम महापालिका शाळांमधील महत्वाचा घटक आणि शिक्षणाचा उत्सव आहे. या कार्यक्रमाद्वारे विद्यार्थी, शिक्षकांना महापालिका शाळांच्या यशाचे आणि आकांक्षांचे
साक्षीदार होण्याची संधी उपलब्ध होणार आहे
या कार्यक्रमामध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रम, शालेय प्रदर्शन, विविध मुद्द्यांवर चर्चासत्र, उत्कृष्ट कामगिरी करणार्या शाळांचा सन्मान तसेच विविध शाळांमधील विद्यार्थ्यांच्या नृत्य, संगीत आणि लोककलांचा समावेश असणार आहे. तसेच शालेय प्रदर्शनांमध्ये शिक्षकांच्या मदतीने विद्यार्थ्यांनी केलेले प्रकल्प, आराखडे, चित्रकला, हस्तकलांचा समावेश असणार आहे. चर्चासत्रांमध्ये महापालिका शाळांमधील माजी विद्यार्थी त्यांचा प्रेरणादायी प्रवास सांगणार आहेत. यासोबतच शिक्षणाच्या विविध क्षेत्रांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणार्या शाळांना यावेळी सन्मानित करण्यात येणार





