इंदापूर : श्री क्षेत्र निरानरसिंहपुर येथे श्री लक्ष्मी नृसिंह अन्नछत्र सेवा मंडळ ट्रस्ट यांच्या वतीने,श्री लक्ष्मी नृसिंह मंदीरामध्ये दि.०७ सोमवार पासून शतचंडी स्वाहाकार सुरु झालेला असून,तो दि.12 रोजी विजयादशमी (दसरा) या कालावधीमध्ये सपन्न होत असून,विजयदशमी दिवशी दु.१.३० वा. शतचंडी स्वाहाकार पूर्णाहुती तसेच महाप्रसाद सेवेचे आयोजन करण्यात आले आहे.
राज्यातील भक्तगणांनी या शतचंडी स्वाहाकार या धार्मिक कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागी होत,विधीवत कार्यक्रम सुरू ठेवले आहेत.मंगळवार ता.८ रोजी पुष्प आर्चन सेवा व आरती हजारो भक्तगणांच्या उपस्थितीत करण्यात आली. बुधवार ता.९ रोजी सायं ६वा हिरण्य अर्चन व आरती,तसेच गुरुवार ता.१० रोजी सायं कुंकुम आर्चन व आरती, शुक्रवार ता.११ रोजी सायं ६ वाजता कुमारिका पुजन व आरती.शनिवार ता.१२ रोजी दु.१.३० वा.शतचंडी स्वाहाकार पूर्णाहुती व महाप्रसाद याचे आयोजन केले आहे.
सदर कार्यक्रमाचे प्रमुख यजमान पद गौरव विलास दंडवते (नरसिंहपूर) व प्रणव (मालक) परिचारक (पंढरपूर),जयंत नरहर देशपांडे (मुंबई) विजय नारायण ताटे देशमुख (संगम) तसेच वासुदेव दहिवळ,अकलूज यांच्या हस्ते,पुण्य वाचन करून कार्यक्रमास सुरुवात झाली.अशी माहिती लक्ष्मी नृसिंह अन्नछत्र सेवा मंडळ ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत दंडवते यांनी दिली.
सदर कार्यक्रमाचे पौरोहित्य वेदमूर्ती ओंकार शास्त्री डिंगरे व.वेदमूर्ती सुदर्शन शास्त्री जकाते व सहकारी करीत आहेत.हे कार्यक्रम पार पाडण्याकरिता समस्त ब्रह्मवृंद नरसिंहपुर तसेच श्री देवस्थान ट्रस्ट व ग्रामस्थ यांचे विशेष सहकार्य लाभत आहे अशी माहिती अन्नछत्र सेवा मंडळ ट्रस्टच्या वतीने श्रीकांत दंडवते यांनी दिली आहे.