अहिल्यानगर,- मराठी पत्रकार परिषदेच्या वर्धापन दिन पत्रकार आरोग्य दिवस म्हणून साजरा केला जाणार आहे. या पार्श्वभूमीवर मराठी पत्रकार परिषदने डॉ.विठ्ठलराव विखे पाटील मेडिकल कॉलेजच्या सहकार्याने मंगळवारी (दि.3) अहिल्यानगरमधील अर्बन हेल्थ सेंटर, सावेडी येथे सकाळी 11 ते दुपारी 2 यावेळेत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराचा सर्व पत्रकारांनी लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
या शिबिरासाठी प्रमुख पाहुणे म्हणून माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील, आमदार संग्राम जगताप, डॉ. विठ्ठलराव विखे पाटील मेडिकल कॉलेजचे संचालक डॉ. अभिजित दिवटे उपस्थित राहणार आहे. सदर शिबिरात ब्लड प्रेशर, शुगर लेव्हल, हिमोग्लोबिन यासह विविध आरोग्य तपासण्या मोफत करण्यात येणार आहे.