असोसिएशनचे प्रवक्ते अली दारूवाला यांची माहिती
वाघोली (प्रतिनिधी) : शासकीय विभागाकडे सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर पुणे शहरात दिनांक ५ पासून सर्वसामान्य नागरिकांना पेट्रोल डिझेल मिळणार असून याबाबतचे विक्रीचे अनुकूल निर्देश (ऑर्डर) पुणे महानगर पालिका आयुक्त शेखर गायकवाड यांच्याकडून मिळाली असल्याची माहिती ऑल इंडिया पेट्रोल डिलर्स असोसिएशनचे प्रवक्ते अली दारूवाला यांनी दिली आहे.
पुणे शहरात कोरोना रोगाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे अत्यावश्यक सेवा वगळता इतरांना पेट्रोल डिझेल विक्रीबाबत निर्बंध घालण्यात आले होते. मात्र पेट्रोलियम असोसिएशनच्यावतीने वारंवार पाठपुरावा केल्यानंतर आता सामान्य नागरिकांना देखील पेट्रोल-डिझेल मिळणार असल्याने पुणे शहरातील नागरिकांना त्यामुळे दिलासा मिळणार आहे.