रेमडेसिविर वितरणासाठी रुग्णांची यादी कळविण्याचे रुग्णालयांना आदेश

पुणे  -करोनासाठी समर्पित रुग्णालयांतील रुग्णांची यादी महापालिकेने अपडेट करून कळवावी, असे आदेश रेमडेसिविरच्या वितरणाबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाने पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिका आणि जिल्ह्याच्या आरोग्य विभागाला दिले आहेत.

जिल्ह्यातील रेमडेसिविरच्या टंचाईच्या अनुषंगाने महापालिकेच्या हद्दीत असलेल्या “डीसीएच’ आणि “डीसीएचसी’मध्ये उपलब्धतेनुसार आणि “फंक्‍शनल बेडस’च्या प्रमाणात आपल्याकडील प्राप्त रुग्णालयांच्या याद्यानुसार केला जात आहे. त्यामुळे ही यादी अद्ययावत करावी, असे जिल्हाधिकारी कार्यालयाने कळवले आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून रेमडेसिविरचा गोंधळ सुरू आहे. महापालिकेच्या करोना समर्पित रुग्णालये आणि दोन्ही जम्बो रुग्णालयांमध्येही रेमडेसिविरचा तुटवडा होता. मात्र, या रुग्णालयांमध्ये आणि जम्बोमध्ये हे इंजेक्‍शन उपलब्ध करून देता यावे, यासाठी महापालिकेकडे रुग्णालये आणि फंक्‍शनल बेडचा तपशील जिल्हाधिकाऱ्यांनी मागवला आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Comments are closed.