मुंबई – शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या आमदार अपात्रता प्रकरणाची आज न्यायालयात सुनावणी घेण्यात आली. मात्र, सुनावणीच्या वेळी सरन्यायाधीशांनी दोन्ही बाजूच्या वकिलांना एकत्रित अहवाल देण्याचे आदेश दिले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणामध्ये मागील आठवड्यात न्यायालयाने उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्यासोबत असणारे ४१ आमदार यांना अपात्र का करू नये या संदर्भात उत्तर देण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यामुळे या संदर्भात आगामी काही दिवसात सुनावणीची तारीख मिळण्याची शक्यता आहे.
आज झालेल्या सुनावणीमध्ये सरन्यायाधीशांनी शिवसेना आमदार अपात्रतेचे प्रकरण जुने असल्याचे सांगताना त्यावर लवकरच निकाल दिला जाऊ शकतो, असे संकेत दिले आहेत. त्यामुळे कशा प्रकारचा निकाल न्यायालय सुनावते, याची उत्सूकता राजकीय वर्तुळात असणार आहे.