दंगलीतील आरोपींची मालमत्ता जप्त करण्याचा आदेश

मुज्जफरनगर – उत्तरप्रदेशात मुज्जफरनगर येथे झालेल्या दंगलीच्या प्रकरणातील सर्व सहा आरोपींच्या मालमत्ता जप्त करण्यात आदेश येथील स्थानिक कोर्टाने दिला आहे. या आरोपींवर दंगलीच्या काळात एका इसमाची हत्या केल्याचा आरोप होता. या आरोपींवर खटला दाखल केल्यानंतर ते फरारी झाले होते.

कोर्टाने नोटीस बजाऊनही ते कोर्टाच्या सुनावणीला उपस्थित नव्हते. या प्रकरणाची पुढील सुनावणी 7 जूनला होणार आहे. 27 ऑगस्ट 2013 रोजी झालेल्या या हत्या प्रकरणानंतर मुज्जफरनगर परिसरात मोठ्या दंगली झाल्या होत्या. त्यात किमान 60 जणांची हत्या झाली होती. तसेच दंगलीच्या भीतीने या भागातील किमान चाळीस हजार लोकांनी स्थलांतर केले होते. ही दंगल नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासन व पोलिसांना बरेच प्रयत्न करावे लागले होते.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.