सफाई कर्मचाऱ्यांना महिनाभरात मूलभूत सुविधा पुरविण्याचे आदेश

पिंपरी – महापालिकेच्या वतीने सफाई कर्मचाऱ्यांना मूलभूत सुविधा एक महिन्याच्या आत पुरविण्याचे आदेश राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाच्या सदस्या डॉ. स्वराज विद्वान यांनी महापालिका आयुक्‍त श्रावण हर्डीकर यांना दिले आहेत.

सुमारे 384 सफाई कामगारांना मोफत घरकुले द्या, पात्र सफाई कर्मचाऱ्यांना बढती द्यावी, तक्रारींकडे कानाडोळा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी तसेच, पीडित महिला कर्मचाऱ्यांच्या तक्रारी विशाखा समितीकडे हस्तांतरीत कराव्यात, असे आदेशही डॉ. विद्वान यांनी दिले. महापालिकेत काम करणाऱ्या अनुसूचित जाती आणि सफाई कर्मचाऱ्यांच्या समस्यांकडे दुर्लक्ष होत असल्याची तक्रार ऍड.सागर चरण यांनी राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाकडे केली होती.आयुक्‍त श्रावण हर्डीकर, आरोग्य – वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल रॉय, सहायक आरोग्याधिकारी गणेश देशपांडे उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.