पुणे – विधानमंडळाचे अधिवेशन सोमवारपासून (दि.24) सुरू होणार आहे. त्यासाठी राज्यातील जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना सुट्टीदिवशी कामावर येण्याचे आदेश आरोग्य विभागाचे सहसंचालकांनी दिले आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना बुधवारी (दि.19), शनिवारी (दि.22) शासकीय सुट्टी दिवशी कार्यालयात हजर राहावे लागणार आहे.
महाराष्ट्र राज्याचे विधीमंडळाचे हिवाळी मुंबई येथे सुरू होत आहे. या अधिवेशनासाठी आरोग्य सेवा आयुक्तालयामार्फत प्रश्न व उत्तरे घेणे व इतर अतिमहत्त्वाच्या कामकाजासाठी वरील दोन शासकीय सुट्टी दिवशी कार्यालये सुरू राहणार आहेत.