नवी दिल्ली -आयपीएल स्पर्धेला जोरदार प्रारंभ झाला असून 12 सामन्यांमध्ये भारतीय खेळाडूंचा दबदबा दिसून येत आहे. आयपीएल स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजाला ऑरेंज कॅप दिली जाते तर सर्वाधिक गडी बाद करणाऱ्या गोलंदाजाला पर्पल कॅप दिली जाते. या शर्यतीत टॉप 5 खेळाडूंमध्ये भारतीय खेळाडूंचा बोलबाला आहे.
पर्पल कॅपच्या शर्यतीत 5 पैकी चार खेळाडू हे भारतीय खेळाडू आहेत. विशेष, यातील 2 खेळाडू असे आहेत, ज्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलेले नाही. हर्षल पटेल आणि आवेश खान यांनी या हंगामात उत्कृष्ट गोलंदाजी केली आहे. तसेच या यादीत राहुल चहर देखील आहे. ज्याने भारतीय संघाकडून 3 टी -20 सामने खेळले आहेत. या यादीत सर्वोच्च स्थानी हर्षल पटेल आहे. ज्याने आतापर्यंत 9 गडी बाद केले आहेत.
तसेच ऑरेंज कॅपच्या शर्यतीत, दिल्ली कॅपिटल्सचा सलामीवीर शिखर धवन हा 231 धावांसह पहिल्या क्रमांकावर आहे. तर या शर्यतीत एकमेव परदेशी खेळाडू आहे ज्याने रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. तुफानी फटकेबाजी करत ग्लेन मॅक्सवेल हा 176 धावा करत, दुसऱ्या स्थानावर आहे.