पिंपरी – पोलीस कर्मचारी असलेल्या पत्नीला तोंडी तलाक देणाऱ्या पतीसह चार जणांवर विवाहितेच्या छळ प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना खंडोबा माळ, भोसरी येथे घडली.
आझम पापाभाई पटेल (वय 35), दीर फरीयाज पटेल (वय 32), सासू आणि नणंद (सर्व रा. खंडोबा माळ, भोसरी) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत पीडित विवाहितेने शनिवारी (दि. 20) भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना 9 एप्रिल 2017 ते 20 मार्च 2021 या कालावधीत भोसरी येथे घडली.
फिर्यादी यांचे आरोपी पती आझम पटेल याच्याशी लग्न झाल्यानंतर माहेराहून पाच लाख रुपये आण. तसेच तुझ्या पगाराचे पैसे दे, असे म्हणत चारित्र्यावर संशय घेऊन वारंवार आरोपींनी विवाहितेचा छळ केला. तसेच आरोपी आझम पटेल याने विवाहितेला तोंडी तलाक दिला.