ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी फायनान्स कंपन्यांकडून अनेक प्रस्ताव सादर केले जातात आणि ते प्रस्ताव ग्राहकांच्या पसंतीला पडत असल्याचे एकंदरित चित्र आहे. बहुतांश फायनान्स कंपन्यांचे नियम हे बॅंकेप्रमाणेच असल्याची जाणीव नागरिकांना झाली आहे. गृहकर्ज देण्याच्या प्रक्रियेतही पारदर्शकता असल्याने गेल्या काही वर्षापासून फायनान्स कंपन्या आणि बॅंका यांच्यातील अंतर कमी होत चालले आहे.
लाखो, कोट्यवधीच्या गृहकर्ज बाजारात हौसिंग फायनान्स कंपन्यांची भागीदारी वाढत असल्याचे दिसून येत आहे. ग्राहकही बॅंकेसारखा सक्षम पर्याय असतानाही गृहकर्जासाठी फायनान्स कंपनीकडे वळत असल्याची चिन्हे आहेत. लहान व्यावसायिक, कमी उत्पन्न असणाऱ्या घटकांसाठी फायनान्स कंपन्यांचे गृहकर्ज उपयुक्त ठरत आहेत. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी फायनान्स कंपन्यांकडून अनेक प्रस्ताव सादर केले जातात आणि ते प्रस्ताव ग्राहकांच्या पसंतीला पडत असल्याचे एकंदरित चित्र आहे.
घराचे स्वप्न साकारण्यासाठी गृहकर्जाची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. गृहकर्जासाठी बॅंका हे ग्राहकांचे उत्पन्नाचे साधन, आर्थिक स्थिती आणि कौटुंबीक जबाबदाऱ्या याचे आकलन करतात. यासाठी बॅंकांकडून कागदपत्राची सतत मागणी होत असते. परिणामी कर्जदाराला फाईल मंजूर करण्यासाठी बॅंकेत अनेक चकरा माराव्या लागतात. अर्थात यापैकी अनेकांना गृहकर्ज देणाऱ्या फायनान्स कंपन्यांची माहिती नसते.विशेष म्हणजे गृहकर्ज योजनेतील नावीन्य, परवडणारे व्याजदर, लवचिकता, कर्ज देण्याची सुटसुटीत प्रक्रिया आणि कागदपत्रांची कमी झंझट यामुळे फायनान्स कंपन्या या बॅंकांपेक्षा सरस ठरताना दिसून येत आहे. म्हणूनच गृहकर्ज क्षेत्रात हौसिंग फायनान्स कंपन्यांची भागीदारी दिवसेंदिवस वाढत चालली आहे.
‘पर्याय फायनान्स कंपन्यांचा’ (भाग-२)
गृहकर्ज हा नागरिकांचा ऐच्छिक मामला आहे. बहुतांश प्रकरणात खातेदारांनाच गृहकर्ज देण्याबाबत बॅंका आग्रही असतात. कारण कदाचित संबंधित खातेदाराने गृहकर्जाच्या अगोदर वैयक्तिक कर्ज देखील घेतलेले असू शकते. अशा स्थितीत बॅंकेकडून गृहकर्ज घेण्याबाबत फारशा अडचणी येत नाही. अर्थात आता हा ट्रेंड बदलत चालला आहे. बहुतांश फायनान्स कंपन्यांचे नियम हे बॅंकेप्रमाणेच असल्याची जाणीव नागरिकांना झाली आहे. गृहकर्ज देण्याच्या प्रक्रियेतही पारदर्शकता असल्याने गेल्या काही वर्षापासून फायनान्स कंपन्या आणि बॅंका यांच्यातील अंतर कमी होत चालले आहे. म्हणूनच आता लाखो कोट्यवधींच्या गृहकर्जाच्या बाजारात हौसिंग फायनान्स कंपन्यांची भागिदारी वाढत चालली आहे. हौसिंग फायनान्सच्या गृह कर्ज प्रस्तावाबाबत ग्राहक समाधानी दिसून येत आहेत.
– प्रियांका जाधव