आंदोलनामागे अपप्रवृत्ती! आंदोलन बदनाम होणार नाही याची काळजी घ्यावी – मुख्यमंत्री 

मुंबई: मराठा समाजाच्या मागण्यांची दखल शासनाने घेतली असून शासन खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभे आहे. तसेच मराठा आंदोलनाच्या मागे अपप्रवृत्ती आहे. आपले आंदोलन बदनाम होणार नाही. याची काळजी मराठा समाजाने घ्यावी, अशी विनंती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.
मराठा क्रांती मोर्च्याच्या वतीने राज्यभर मराठा आरक्षण व इत्तर मागन्यांसाठी आंदोलन सुरु आहेत. अनेक ठिकाणी याला हिंसक वळण देखील लागले होते. दरम्यान, मराठा आंदोलनकर्त्यांनी आत्महत्या देखील केल्या.  या आंदोलनादरम्यान पोलिसांनी कार्यकर्त्यांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल केले. हे गुन्हे चौकशी करून मागे घेण्यात येतील, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे.
आज मुंबईत मराठा आरक्षणासंदर्भात देवेंद्र फडणवीस यांनी सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलावली होती. ही बैठक संपली असून मराठा आरक्षणासंदर्भात विरोधकांसोबत एकमत झाल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
मराठा समाजाने काढलेल्या शांततापूर्ण मोर्चाचं देशाने गौरव केला. पण मराठा समाजाने तांत्रिक अडचणी समजून घ्याव्यात, कुठे हिंसाचार करू नये, अशी विनंती मुख्यमंत्र्यांनी केली.
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)