उत्तर प्रदेशात शाळा-महाविद्यालयांना सुट्टी तर आज बिहार बंदची हाक
नवी दिल्ली : नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात देशभरात संतापाची लाट उसळली आहे. देशाच्या विविध भागांमध्ये वातावरण पेटत चालले आहे. या विरोधात बिहारमध्ये राष्ट्रीय जनता दलाने आंदोलन पुकारले आहे. आज बिहार बंदची हाक देण्यात आली आहे. तर शुक्रवारी उत्तर प्रदेशात हिंसक आंदोलन झाले. याच पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशातील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे. तर काही भागांत संचारबंदी लागू करण्यात आली आहे.
Bihar: RJD (Rashtriya Janata Dal) workers hold protest in Patna. RJD has called a bandh in Bihar today against the #CitizenshipAmendmentAct. pic.twitter.com/vAsqpzw8aW
— ANI (@ANI) December 21, 2019
रस्त्यांवर आंदोलने सुरू आहे. यामुळेच नागरिकांनी आवश्यक कामांशिवाय घराबाहेर पडू नये, असे आवाहन उत्तर प्रदेश पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे. यासोबतच सीलमपूर, जाफराबाद भागातही निदर्शकांकडून रस्ते बंद करण्यात आले आहेत. दिल्लीतली 7 मेट्रो स्टेशन्स आजही बंद ठेवण्यात आहेत. यासोबतच देशातील विविध भागात आजही या कायद्याविरोधात आंदोलन करण्यात येणार आहे. हैदराबादमध्ये एमआयएमकडून आंदोलन केले जाणार आहे.