जबलपूर : भाजपच्या खासदार आणि बॉलीवूड अभिनेत्री कंगना राणावत यांच्या इमर्जन्सी चित्रपटाविरोधात जनहित याचिका दाखल झाली. त्यावरून मध्यप्रदेश उच्च न्यायालयाने सोमवारी कंगना, केंद्र सरकार आणि सेन्सॉर बोर्डाला नोटिसा जारी केल्या.
कंगना इमर्जन्सीमध्ये माजी पंतप्रधान दिवंगत इंदिरा गांधी यांची भूमिका साकारत आहेत. त्या चित्रपटाला अद्याप सेन्सॉर बोर्डाने हिरवा कंदील दाखवलेला नाही. अशात दोन शीख संघटनांनी चित्रपटाला विरोध दर्शवत याचिका दाखल केली आहे.