काश्‍मीरातील विद्यार्थ्यांचा परीक्षा देण्यास विरोध

अभ्यासक्रम पुर्ण व्हायच्या आतच वार्षिक परीक्षांचा कार्यक्रम जाहीर

श्रीनगर: जम्मू काश्‍मीरातील विशेषत: काश्‍मीर खोऱ्यातील विद्यार्थी आणि पालकांनी वार्षिक परीक्षा देण्यास नकार दिला आहे. अजून निम्मा अभ्यासक्रमही शिकवून झालेला नसताना शाळा विभागाने आपला वार्षिक परीक्षांचा कार्यक्रम पुढे रेटण्याचा निर्धार व्यक्त करीत हा कार्यक्रमही जाहीर केल्याने पालकांनीही संताप व्यक्त केला आहे. काश्‍मीरात सध्या 370 कलमांच्या प्रकरणामुळे 5 ऑगस्टपासून शाळा बंद आहेत. तरीही या वार्षिक परिक्षा घेण्याचा अट्टहास कशासाठी केला जात आहे असा सवाल त्यांनी केला आहे.

वार्षिक परीक्षा घ्यायच्याच असतील तर अभ्यासक्रमात कपात केली जावी अशी पालक व विद्यार्थ्यांची सुचना आहे. त्यावर शालेय शिक्षण विभागाने अजून काहीही निर्णय घेतलेला नाही. तथापी वार्षिक परिक्षा घेतली नाही तर विद्यार्थ्यांचे वर्षच वाया जाण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे वार्षिक परीक्षांचा कार्यक्रम रद्द करणे शक्‍य नाहीं असे शालेय शिक्षण विभागाचे म्हणणे आहे.

सध्याच्या तणावाच्या वातावरणामुळे आम्हाला अभ्यास करता आलेला नाही, असे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. आम्ही जेमतेम अर्धाच अभ्यासक्रम आत्तापर्यंत पुर्ण केला आहे असे ते म्हणाले. आम्ही 5 ऑगस्ट पासून घरातच आहोत शाळेत गेलेलो नाही असे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. आणि ते खरेही आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.