नवी दिल्ली – केंद्र सरकारने 2019-20 या वर्षासाठी भविष्यनिर्वाह निधी वरील व्याजदर कमी करून 8.5% केलेला आहे. मात्र, सध्याच्या परिस्थितीत या व्याजदरांमध्ये बदल केला जाऊ शकतो, असे वृत्त प्रसारित होत आहे. मात्र, अशा प्रकारच्या निर्णयास आमचा विरोध आहे असे ऑल इंडिया ट्रेड युनियन कॉंग्रेस या कामगारांच्या संघटनेने म्हटले आहे.
देशभरातील सहा कोटी कामगार अगोदरच अडचणीत आहेत. त्यांच्या अर्थार्जनावर परिणाम झालेला आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत भविष्यनिर्वाह निधी वरील व्याजदर कमी केले जाऊ नयेत, असे या संघटनेने म्हटले आहे. मात्र, देशातील एकूणच व्याजदर कमी होत आहेत. त्यामुळे भविष्यनिर्वाह निधीवरील व्याजदरही कमी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.