इम्रान खान यांच्या विरोधात विरोधी पक्ष एकवटले 

इस्लामाबाद – पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी तेथील सर्व विरोधी पक्ष सध्या एकवटले असल्याचे वृत्त आहे. या सरकारच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी विरोधकांनी एकत्रितपणे देशव्यापी निदर्शने सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

काल सरकारच्या विरोधात सर्व पक्षीय नेत्यांची एकत्रित बैठक झाली. त्यात 26 कलमी संयुक्‍त जाहीरनामा प्रकाशित करण्यात आला. या बैठकीला नवाज शरीफ यांच्या पक्षाचे प्रतिनिधी तसेच उलेमा ई इस्लाम फजल आणि अन्य प्रमुख पक्षांचे प्रतिनिधीही उपस्थित होते.

त्यानंतर घेण्यात आलेल्या एका संयुक्त पत्रकार परिषदेत मौलाना फजलुर रहमान यांनी बैठकीत संमत झालेल्या ठरावाची प्रत वाचून दाखवली. सर्व विरोधकांनी एकत्रित येऊन पाकिस्तान डेमोक्रॅटिक मुव्हमेंट नावाने एक वेगळी आघाडीच उघडली आहे.

इम्रान खान सरकारच्या विरोधात पुढील महिन्यांपासून देशव्यापी आंदोलन सुरू करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. देशातील विद्यमान सरकार बरखास्त करून पुन्हा पारदर्शक पद्धतीने सार्वत्रिक निवडणुका घ्याव्यात अशी या पक्षांची मागणी आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.