विरोधी पक्ष भ्रष्टाचारी आणि मूर्ख – सुब्रमण्यम स्वामी यांची विरोधी पक्षांना अर्वाचक भाषेत टीका

नवी दिल्ली – लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे अक्षरश: पानिपत झाले आहे.  तर लोकसभा निवडणुकीच्या निकालांमध्ये भाजपा आणि एनडीएने दणदणीत विजय मिळवला आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवावी जबाबदारी स्वीकारली असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाला शुभेच्छा दिल्या आहेत. मात्र निकालानंतर काँग्रेसवर जोरदार टीका केली जात आहे. भाजपाचे नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर काँग्रेसवर निशाणा साधला आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, सुब्रमण्यम स्वामी यांनी ट्विटद्वारे काँग्रेसला टोला लगावला आहे की, ‘भाजपाचा अभूतपूर्व विजय झालेला आहे. अशात मला असं वाटतं की देशाला एका चांगल्या, स्वच्छ प्रतिमा असलेल्या, बुद्धीमान विरोधी पक्षाची गरज आहे. यामुळेच लोकशाहीचा आदर राखला जाईल, मात्र सध्याचा विरोधी पक्ष भ्रष्टाचारी आणि मूर्ख आहे’ असं ट्वीट सुब्रमण्यम स्वामी यांनी केलं आहे.

तत्पूर्वी आज या पराभवामागील कारणांवर चर्चा करण्यासाठी काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची आज बैठक सुरु झाली आहे. यावेळी पराभवाची जबाबदारी स्वीकारून काँग्रेस पक्षाध्यक्ष राहुल गांधी आपल्या पदाचा राजीनामा कार्यकारिणीसमोर सादर केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.