मुंबई – विरोधी पक्षांचे प्रमुख नेते शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहिले नाहीत. त्यांची अनुपस्थिती चटकन जाणवणारी ठरली. महायुतीकडून माजी मुख्यमंत्र्यांबरोबरच विरोधी पक्षांच्या प्रमुखांनाही निमंत्रण देण्यात आले होते.
त्यामध्ये ज्येष्ठ नेते शरद पवार, उद्धव ठाकरे, कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचाही समावेश होता. मात्र, ते सोहळ्याला उपस्थित राहिले नाहीत. निमंत्रण असलेले मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेही अनुपस्थित राहिले. साहजिकच, शपथविधी सोहळ्याला भाजप आणि मित्रपक्षांचे शक्तिप्रदर्शन असे स्वरूप प्राप्त झाले.