पुणे – सहायक प्राध्यापक पदासाठी अनिवार्य असलेल्या राष्ट्रीय पात्रता परीक्षा अर्थात ‘नेट’ परीक्षेसाठी अर्ज करण्यास पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे. अद्यापपर्यंत ज्या उमेदवारांनी अर्ज केला नाही, त्यांना ऑनलाइन अर्ज करता येईल. त्यासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया दि.22 ऑगस्टपासून सुरू झाली असून, त्याची अंतिम मुदत दि.10 सप्टेंबर आहे.
यापूूर्वीच ‘नेट’साठी अर्ज मागवण्यात आले होते. करोनामुळे अर्ज करण्यास मुदतवाढ देण्यात आली. मात्र, करोना आणि लॉकडाऊनमुळे काही विद्यार्थ्यांना अर्ज भरता आले नाही. त्यांना ‘सीएसआयआर-यूजीसी नेट’ परीक्षेसाठी अर्ज करण्यास लिंक खुली करण्याचा निर्णय ‘नॅशनल टेस्टिंग एजन्सीने’ घेतला आहे.
ऑनलाइन अर्ज ही प्रक्रिया 10 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत सुरू असेल. तसेच, 10 सप्टेंबर रोजी रात्री 11.50 पर्यंत शुल्क स्वीकारले जाईल.
अर्जाचे शुल्क क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, नेट बॅंकिंगद्वारे ऑनलाइन पद्धतीने भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच, दि. 11 ते 17 सप्टेंबरदरम्यान ‘एनटीए’मार्फत अर्जात दुरुस्ती करता येणार आहे. या कालावधीत अर्जात दुरुस्ती करता येणार आहे.