शिरूर – शिरूर तालुक्यातील स्थानिक तरुणांना रांजणगाव औद्योगिक वसाहतीतील कंपन्यांमध्ये स्थानिक तरुणांना नोकऱ्या देण्यासाठी औद्योगिक वसाहतीतील कंपन्या होकारार्थी आहे असे आमदार अशोक पवार यांनी सांगितले.
यामुळे शिरूर तालुक्यात तरुणांना दिलासा मिळणार आहे अनेक गुणवत्ता असणारे तरुण शिरूर तालुक्यात आहेत परंतु स्थानिकांच्या भीतीमुळे त्यांना नोकरी भेटली नाही अशांना आता दिलासा मिळणार त्यांनी सांगितले.
शिरूर तालुक्यातील स्थानिक तरुणांना औद्योगिक वसाहतीत नोकरी मिळावी म्हणून आज आमदार अशोक पवार यांच्या नेतृत्वाखाली, शिरूर प्रांत संतोषकुमार देशमुख त्यांची रांजणगाव औद्योगिक वसाहतीतील कंपन्यांबरोबर नुकतीच शिरूर तहसील कार्यालय सभागृह शिरूर येथे बैठक झाली.
या बैठकीला प्रांताधिकारी संतोषकुमार देशमुख, शिरूरच्या तहसीलदार लैला शेख ,रांजणगाव औद्योगिक वसाहतीतील ब्रिटानिया कंपनी मतीन सय्यद, एलजी इलेक्ट्रॉनिक कंपनी, आयटीसी कंपनी, हायर कंपनी या चार कंपनीच्या मनुष्यबळ अधिकारी यावेळी उपस्थित होते,
या बैठकीत प्रथम कंपन्यांच्या अडचणी समजावून घेतल्या यावेळी कंपनी व्यवस्थापनाने स्थानिक तरुणांना नोकरी देण्यास सकारात्मकता दाखवली त्याबरोबर स्थानिक तरुणांकडून दहशत निर्माण केली जाते अशी भीती त्यांनी व्यक्त केली. त्यावर नियंत्रण ठेवले तर स्थानिक तरुण कंपनी व्यवस्थापनाला कामासाठी लागतीलच असही ही कंपनी अधिकाऱ्यांनी सांगितले.
यावेळी झालेल्या बैठकीमध्ये शिरूर तालुक्यातील स्थानिक तरुणांना त्यांच्या गुणवत्तेनुसार औद्योगिक वसाहतीतील या कंपन्यांनी नोकरी देण्याची तयारी ठेवली आहे. परंतु काही तरुण याठिकाणी दादागिरी करून कंपनी व्यवस्थापनाला त्रास देत असल्याचे यावेळी सांगण्यात आले. यासाठी नियमावली करावी असे या बैठकीत ठरले असल्याचे आमदार पवार यांनी सांगितले.
रांजणगाव औद्योगिक वसाहतीत मध्ये स्थानिक तरुणांना येथील कंपन्या नोकरी देत असतील तर तरुणांनी यात सहभागी होऊन कंपनी व्यवस्थापन यांना कायमस्वरूपी सहकार्य करण्याची भावना ठेवावी आमदार अशोक पवार यांनी सांगितले. यामुळे आपल्या भागातील तरुणांना नोकऱ्या मिळणार आहेत व पुढील पिढीलाही त्याचा उपयोग होणार आहे.
त्यामुळे औद्योगिक वसाहतीत नोकरी करताना तालुक्यातील तरुणांनी संयम बाळगायला हवा असे आमदार अशोक पवार यांनी सांगितले. तर कंपनी व्यवस्थापनाने ही स्थानिक तरुणाशी इतर कामगारांना सारखे वागावे अशी सूचनाही त्यांनी कंपनी व्यवस्थापन स दिल्या.
शिरूर तालुक्यातील आज बैठकीला असलेल्या चार कंपन्यांच्या मनुष्यबळ अधिकारी यांनी आपल्याला स्थानिक तरुणांना सहभागी करून घेण्यासाठीची होकार दिला आहे त्यासाठी लवकरच त्यांना हव्या असलेल्या गुणवत्ता नुसार कामगारांची लिस्ट कंपनी व्यवस्थापन आपल्याला देणार आहे.
त्यानुसार पहिल्या टप्प्यात काही ही तरुणांना आपण नोकरी देऊ शकतो तर इतर कंपन्यांसाठी लवकरच आणखी एक बैठक बोलावण्यात येणार असल्याचे आमदार अशोक पवार व प्रांताधिकारी संतोष कुमार देशमुख यांनी सांगितले.
स्थानिक तरुणांना नोकरी मिळावी यासाठी शिरूर प्रांत संतोषकुमार देशमुख आग्रही असल्याचे दिसून आले.