आजच्या बाजारात दडलेल्या संधी (भाग-२)

आजच्या बाजारात दडलेल्या संधी (भाग-१)

एचडीबी फायनॅन्शिअल सर्व्हिसेस – ही कंपनी एचडीएफसी बँकेची सब्सिडिअरी कंपनी आहे. एचडीएफसी बँकेचे सर्वेसर्वा असलेले आदित्य पुरी यांनी मागील आठवड्यात एका माध्यमास मुलाखत देताना या कंपनीच्या आयपीओ बद्दल सूतोवाच केलं. त्यामुळं आता ह्या बँकेच्या शेअर्सचा बाजार गरम होऊ लागेल यात कांही नवल नाही. (या बँकेबद्दल विस्तृत माहिती १९ नोव्हेंबर २०१८ च्या लेखात दिलेली आहे. हा अंक ऑनलाईन उपलब्ध असल्यानं पुन्हा सहज वाचता येऊ शकतो.) जाताजाता त्यांनी हे देखील सांगितलं की, अजूनही बँक क्षेत्रास विस्तार करायला खूप जागा आहे, बऱ्याचशा देशात बँकिंग मार्केट हे त्या देशाच्या जीडीपीच्या ५०% आहे तर भारतात तेच १५% आहे. त्यांच्या या म्हणण्यानुसार एचडीबी, कॅथलिक सिरियन बँक, तामिलनाड मर्कंटाईल बँक व सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक, उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक ह्या बँकांकंडं दीर्घ मुदतीसाठी गुंतवणुकीची संधी म्हणून पाहिलं जाऊ शकतं.

उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक – दोनच आठवड्यांआधी एका आर्थिक माध्यमातून एक बातमी आली की, ही बँक आयपीओ आणण्याच्या आधी २०० कोटी रुपये उभे करणार आहे. यूके स्थित सीडीसी या डेव्हलपमेंट फायनान्स ग्रुपकडं (आधीची कॉमनवेल्थ डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन) उत्कर्ष बँकेचा १४% हिस्सा आहे तर रत्नाकर बँक, फेअरिंग कॅपिटल व सिडबी बँकेकडं देखील कंपनीचा काही हिस्सा आहे. मागील वर्षात कंपनीचं व्याजाचं उत्पन्न ८७ कोटी रुपयांवरून ५१९ कोटी रुपये झालं होतं. नवीन ६५ शाखा उघडण्यासाठी मिळालेल्या परवान्यामुळं बँकेच्या आता ४९६ शाखां होऊ शकतील.

सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक – २१ फेब्रुवारी २०१९ रोजी या बँकेनं आपल्या गुंतवणूकदारांना पाठवलेल्या ईमेल नुसार ह्या बँकेनं १५ मार्च, २०१९ रोजी विशेष सर्वसाधारण सभा आयोजित केलेली आहे. ही बँक २४९ कोटी रुपये खाजगीरित्या (प्रायव्हेट प्लेसमेंटद्वारा) उभे करत आहे ज्यात दहा रुपये दर्शनी किंमतीचे एकूण सुमारे १.३८ कोटी शेअर्स १८० रुपये प्रति शेअर भावानं विकण्याचा प्रस्ताव आहे. ज्यांपैकी एचडीएफसी होल्डिंग ही कंपनी २.८६ %, एचडीएफसी स्टॅंडर्ड लाईफ इन्शुरन्स कंपनी ३.८०%, टीव्हीएस श्रीराम ग्रोथ फंड ४.९९ % ह्या प्रमुख गुंतवणूकदार संस्था आहेत. याव्यतिरिक्त याआधीच एचडीएफसी व आयडीएफसी बँक या बँकांची उत्कर्ष बँकेत गुंतवणूक आहे. ही नोटीस आल्यानं या शेअरचा भाव एका रात्रीत सुमारे २५% वाढलेला आहे.

कर्लऑन इंटरप्रायझेस – १९ नोव्हेंबरच्या लेखात सुचविलेली आणखी एक कंपनी. ज्या कंपनीनं पाच शेअर्सवर एक शेअर बोनस देऊन मागील आठवड्यात (१३ फेब्रुवारीस) आपल्या गुंतवणूकदारांना प्रतिशेअर १०९.८५ रुपये (सुमारे २२०० टक्के) लाभांश देखील दिलेला आहे.

यांव्यतिरिक्त अनेक अशा कंपन्या बाजारात उपलब्ध आहेत ज्यांची शेअर बाजारात अजून नोंदणी झाली नाहीय परंतु होण्याची शक्यता आहे. अशा निवडक कंपन्यांमध्ये गुंतवणुकीची संधी उपलब्ध होऊ शकते. अशा शेअर्सच्या खरेदी-विक्रीसाठी माहितगार सल्लागारामार्फतच व्यवहार करणं व्यवहार्य ठरतं कारण यामध्ये विश्वासार्हता फार महत्वाची असते.

सुरुवातीला नमूद केलेल्या फिलिप फिशरबद्दल एक गोष्ट सांगावीशी वाटते ती म्हणजे त्यांच्या प्रसिद्ध गुंतवणुकीबद्दल.  इ.स. १९५५ मध्ये त्यांनी मोटोरोला या कंपनीत गुंतवणूक केली आणि २००४ साली त्यांच्या मृत्यूपर्यंत ती गुंतवणूक विकली नाही. त्यांनी आपल्या पुस्तकात म्हटलयं, “The best time to sell a stock was ‘almost never’” आता संधी पाहून ट्रेडर कधी बनायचं आणि गुंतवणूकदार म्हणून आपली संपत्ती कशी उभी करायची हे ज्याचं त्यानं ठरवावं!

Leave A Reply

Your email address will not be published.