विरोधकांची पोटदुखी अजूनही थांबलेली नाहीच; उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा टोला

मांजरी: मराठा, ओबीसी आरक्षण आणि पदोन्नती बाबत विरोधकांची दुटप्पी भूमिका आहे. मुळात सत्तेत असलेल्या तीन पक्षाचं सरकार कधी पडेल यावर त्यांचं लक्ष आहे. वारंवार संधी साधून सरकार कसे पडेल ते विरोधक पहात आहेत.गेल्या दीड वर्षात काहीच फरक पडला नाही हे विरोधकांच्या चांगलच लक्षात आले आहे. तीन पक्षांचंसत्तेत असलेल सरकार पहावून विरोधकांची अजूनही पोटदुखी सुरूच आहे.असा टोला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधकांना लगावला आहे.

आज सकाळी मांजरी बुद्रुक येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची गव्हर्निंग कौन्सिलची बैठक होती.ती संपल्यानंतर दुपारी पत्रकारांशी बोलताना त्यांनी विरोधकांचा समाचार घेतला.अजित पवार म्हणाले की सोनिया गांधी, शरद पवार आणि उद्धव ठाकरे या वरिष्ठ नेत्यांनी निर्णय घेऊन हे सरकार स्थापन केले आहे. त्यामुळे या तींघांचाही पाठिंबा असेपर्यंतमहाविकास आघाडीला धोका नसल्याचे सांगून उद्याच्या मराठा आरक्षण आंदोलन विषयी बोलताना पवार म्हणाले.

आम्ही छत्रपती संभाजीराजेंना आंदोलन ऐवजी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्याचे आवाहन केले होते. परंतु ते इतके पुढे गेलेत की आता आंदोलन थांबवता येणार नाही असेच दिसते आहे. आमचा आंदोलनाला विरोध नाही . लोकशाहीत कोणीही आपल्या मागण्या हक्कासाठी आंदोलन करू शकतो मात्र, तो काळ आता नाही तरीही कोरोना संसर्ग होणार नाही याची खबरदारी घेऊन आंदोलन करावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे.

दरम्यान कोल्हापुरातून निघणाऱ्या उद्याच्या आंदोलनालाराज्याच्या मंत्रिमंडळातील मंत्री सतेज पाटील आणि हसन मुश्रीफ हे भेट देऊन आंदोनकर्त्यांची भूमिका जाणून घेतली तसेच ते राज्य सरकारची असलेली भूमिकाही सांगतील. अशी माहितीही यावेळी अजित पवार यांनी दिली.तर मराठा आरक्षण बाबतचा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिलेला आहे. त्यामुळे आम्ही नुकतीच पंतप्रधान आणि राज्यपाल यांची भेट घेऊन सरकारची भूमिका सांगितलेली आहे.तरीही राज्याच्या हातातील प्रश्न सोडवायची मुख्यमंत्री मंडळाची तयारी आहे.

“गेली काही महिने लॉकडाऊन मुळे हातावर पोट असणारे, छोटे- मोठे व्यावसाय करणारे अडचणीत सापडलेत.काही प्रमाणात मदत होते आहे, परंतु अनलॉक करणे गरजेचे होते. करोना पॉझिटीव रेट कमी झाल्याने पुण्यात अनलॉक करुन काही बाबतीतचे निर्णय शिथिल करण्यात आले आहेत,मात्र जर हा रेट पाच टक्के किंवा त्यापेक्षा अधिक झाल्यास पुन्हा पुण्यातही कडक निर्बंध घालण्यात येतील असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.”

“उर्वरित गावे महापालिकेत समाविष्ट करण्याचे काम सुरू आहे. त्यासाठी जो आवश्यक वेळ द्यावा लागतो आहे तोच दिला जातो आहे. सध्या ही गावे पीएमआरडीए कडे आहेत. या गावांचा डीपीही तयार झाला असून लवकरच ही गावे महापालिकेत समाविष्ट करण्यात येतील असेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.”

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.