विरोधकांनी 10 ते 15 वर्ष कपालभाती करावी – बाबा रामदेव

नवी दिल्ली –पंतप्रधान म्हणून सलग दुसऱ्या कार्यकाळासाठी नरेंद्र मोदी यांनी गुरूवारी शपथ घेतली. शपथविधीनंतर पंतप्रधान म्हणून मोदींची दुसरी इनिंग आता सुरू झाली आहे. याच पार्श्वभूमीवर रामदेव बाबा यांनी ट्विट करत पंतप्रधान नरेंद मोदी यांना अभिनंदन केले आहे तसेच मोदी यांच्यावर स्तुतीसुमनांचा वर्षाव करत म्हणाले आहे की,’मोदींच्या नेतृत्वाखाली आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतीक आव्हानांचा सामना करण्यास मदत मिळेल. तर विरोधकांना 10 ते 15 वर्ष कपालभाती करण्याचा सल्ला दिला आहे.

दरम्यान, अगामी काळात भारतासमोरील आव्हानांसाठी देशाची वाढती लोकसंख्या जबाबदार आहे. या मुद्द्यावर नियंत्रण आणण्यासाठी लोकसंख्या नितीवर कायदा आणायला हवा. तसेच लोकसभा निवडणुकीत दारुण पराभव झालेल्या पक्षाला 10 ते 15 वर्ष कपालभाती करण्याची गरज आहे, असा टोला यांनी लगावला आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालामुळे विरोधी पक्षनेते तणावातून जात आहेत. 10-15 वर्षापर्यंत तणावाला दूर ठेवण्यासाठी विरोधकांनी कपालभाती करायला हवे. असा खोचक सल्लाही त्यांनी दिला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.