ओप्पोचा सर्वात स्वस्त  5G स्मार्टफोन झाला भारतात लाँच ! जाणून घ्या किंमत आणि फीचर्स !

ओप्पोने आज (मंगळवारी) आपला सर्वात स्वस्त OPPO A53s 5G हा स्मार्टफोन लॉन्च केला. यापूर्वी कंपनीने भारतीय बाजारात A 74 5G देखील बाजारात आणला.

नवीन ओप्पो A53s 5G बद्दल सांगायचे झाल्यास, लॉन्चबरोबरच तो आता भारतीय बाजारातील सर्वात स्वस्त स्मार्टफोन बनला आहे. यात 13 एमपी प्राइमरी कॅमेर्‍यासह ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे. ओप्पो A53s 5G मध्ये मीडियाटेक डायमेंसिटी 700 प्रोसेसर आहे जो 5G प्रोसेसर आहे.

ओप्पो A53s 5G किंमत
ओप्पो A53s 5G च्या 6 जीबी + 128 जीबी व्हेरिएंटची किंमत भारतात 14,990 रुपये आणि 8 जीबी + 128 जीबी व्हेरिएंटसाठी 16,990 रुपये आहे. 2 मे रोजी दुपारी 12 वाजता फ्लिपकार्टवरून ग्राहकांना ते खरेदी करता येणार आहे. हे क्रिस्टल ब्लु आणि इंक ब्लॅक रंगाच्या पर्यायांमध्ये खरेदी करता येईल. ओप्पोचा हा नवीन फोन आता 14,990 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत भारतातील सर्वात स्वस्त स्मार्टफोन बनला आहे. यापूर्वी रिअल मी आपली रिअल मी 8 5G हा स्मार्टफोन 14,999 रुपयांमध्ये बाजारात आणला.
लॉन्चच्या ऑफरबद्दल बोलायचं तर, ग्राहकांना फ्लिपकार्टवरील एचडीएफसी बँक कार्डवर 1,250 रुपयांपर्यंत 10% त्वरित सवलत मिळेल.

ओप्पो A53s 5G चे फीचर्स
ओप्पोचा हा नवीन स्मार्टफोन अँड्रॉइड 11 बेस्ड कलर ओएस 11.1 वर चालतो आणि त्यात वॉटरड्रॉप नॉचसह 6.52 इंचाचा एचडी + एलसीडी डिस्प्ले आहे या फोनमध्ये 8 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेजसह मीडियाटेक डायमेन्सिटी 700 प्रोसेसर आहे. कार्डच्या मदतीने त्याची अंतर्गत मेमरी 1TB पर्यंत वाढविली जाऊ शकते. येथे रॅम एक्सपान्शन टेक्नोलॉजी देखील आहे, याशिवाय ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. फोटोग्राफीच्या बाबतीत, मागील बाजूस 13 एमपी प्राइमरी कॅमेरा, 2 एमपी मॅक्रो कॅमेरा आणि 2 एमपी डेप्थ सेन्सर देण्यात आला आहे. तसेच सेल्फीसाठी फ्रंटमध्ये 8 एमपीचा कॅमेरा देण्यात आला आहे.

ओप्पो A53s 5Gची बॅटरी
5,000 mAhची आहे आणि 10W फास्ट चार्जिंग सपोर्ट आहे. कनेक्टिव्हिटीसाठी, ड्युअल-मोड 5G, 4G,  वायफाय, ब्लूटूथ आणि जीपीएससाठी सपोर्ट आहे. याशिवाय फोनमध्ये साइड माउंट केलेले फिंगरप्रिंट सेन्सरसुद्धा आहे.

ओप्पो A53s 5G डिस्प्ले
ओप्पो A53s 5G मध्ये 6.5 इंचाचा एचडी + डिस्प्ले आहे, ज्याचा रिझोल्यूशन 720×1600
पिक्सल आहे. त्याचे अस्पेक्ट रेशो 20: 9 आहे आणि रीफ्रेश रेट 90 हर्ट्ज आहे. फोनमध्ये ऑक्टाकोर मीडियाटेक डायमेन्सिटी 720 (एमटी 6853 व्ही) प्रोसेसर आहे. 4G व्हेरिएंटमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 460 प्रोसेसर आहे. हा स्मार्टफोन कलरओएस 7.2 वर Android 10 सह कार्य करतो. हा फोन 4 जीबी / 128 जीबी आणि 6 जीबी / 128 जीबीच्या दोन व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.