रेल्वे स्थानक परिसरात “ऑपरेशन नंबरप्लेट’

पुणे  – स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्‍वभूमीवर रेल्वे प्रशासनाने देशभरातील प्रमुख रेल्वे स्थानक परिसरात संशयास्पद, अनेक दिवसांपासून एकाच ठिकाणी उभ्या असलेल्या वाहनांवर कारवाईसाठी “ऑपरेशन नंबरप्लेट’ ही मोहीम राबवली. या अंतर्गत पुणे विभागातील 9 स्थानकांवर एकूण 89 वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.

रेल्वे प्रशासनाने देशभरात सुमारे 466 स्थानकांवर ही मोहीम राबवली. पुणे विभागातील सासवड, चिंचवड, तळेगाव, देहूरोड, खडकी, दापोडी, शिवाजीनगर, उरुळी, पुणे स्थानकावरदेखील वाहनांची तपासणी करण्यात आली.

Leave A Reply

Your email address will not be published.