प्रभात ‘ऑटो झोन 2019’चे दिमाखदार उदघाटन

शिरूर – पुण्याच्या ग्रामीण भागात वाहन विक्री आणि उद्योगाला चालना मिळण्याच्या हेतूने, “पुण्याची ओळख’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या दै. प्रभातच्या वतीने “ऑटो झोन-2019′ या कार्सच्या तीन दिवसीय प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान, आज प्रभात ‘ऑटो झोन 2019’चे उदघाटन शुक्रवारी झाले. दीपप्रज्वलन आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

यावेळी शिरूरच्या नगराध्यक्षा वैशाली वाखारे, पोलीस निरीक्षक प्रवीण खानापुरे, डॉ संतोष पोटे, निवासीनायब तहसीलदार श्रीशैल वट्टे, सामाजिक कार्यकर्ते प्रकाश वायसे, बाबुराव पाचंगे, बार असोसिएशनचे अध्यक्ष ऍड. सयाजी गायकवाड, माजी नगराध्यक्ष झाकीरखान पठाण, नगरसेविका मनीषा कालेवर, शशिकला काळे, नगरसेवक संजय देशमुख, शिरुर आंबेगाव शिवसेना तालुकाध्यक्ष गणेश जामदार, मयूर थोरात आदी उपस्थित होते. उपस्थितांनी यावेळी “ऑटो झोन’ या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या.

शुक्रवार दि. 22 ते रविवार दि. 24 नोव्हेंबर अखेर हे प्रदर्शन शिरुर एसटी स्टॅंडजवळील न्यू इंग्लिश स्कूलच्या मैदानावर होणार आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here