पुणे – शहरातील 100 बेड पेक्षा जास्त बेड असलेल्या रुग्नालयांना सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (एसटीपी) उभारणे बंधनकारक आहे. कोविड उपचार केंद्रातून निर्माण होणारे सांडपाणी थेट बाहेर सोडणे धोकादायक असल्याने त्यावर प्रक्रिया होणे आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेतर्फे पुण्यात उभारण्यात आलेल्या जम्बो कोविड सेंटरची क्षमता 800 बेडची असल्याने, त्यासाठीदेखील असा प्रक्रिया प्रकल्प उभारणे बंधकारक असताना, राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे याबाबत अद्याप एकही अर्ज प्राप्त झाला नसल्याची माहिती समोर आली आहे. यातून या रुग्णालयातून करोना विषाणू असलेले सांडपाणी तसेच सोडले जात आहे का? याबाबत तर्क वितर्क सुरू झाले आहेत.
केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने जाहीर केलेल्या मार्गदर्शक तत्वांनुसार कोविड-19 संबंधित निर्माण होणाऱ्या जैववैद्यकीय कचऱ्याचे व्यवस्थापन नियम 2016 या कायद्यानुसार विल्हेवाट लावणे आवश्यक असते. या कायद्यानुसार 100 किंवा त्याहून अधिक बेड असलेल्या रुग्नालयांना एसटीपी उभारणे सक्तीचा आहे. यापार्श्वभूमीवर पुण्यातील कोविड हॉस्पिटलची क्षमता 800 बेडेची आहे. यासाठी एसटीपी आवश्यक असताना याबाबत एकही अर्ज प्राप्त झाला नसल्याची माहिती मंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
करोना पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या आपत्कालीन परिस्थितीमुळे प्रतिबंधात्मक उपाय म्हणून अशा प्रकारची सुविधा उभारणे आवश्यक होते. मात्र, याठिकाणी जैविक कचऱ्यासंदर्भातील नियमांचे पालन होणे अत्यावश्यक असते. तसेच, त्यासंदर्भातील माहिती प्रदूषण नियंत्रण मंडळाला देने बंधकारक असते.
मात्र, जंम्बे कोविड रुग्नालय उभारताना महापालिकेने मंडळाला याबाबतची कोणतीही माहिती प्रदूषण नियंत्रण मंडळाला दिलेली नाही. तसेच, करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मंडळाच्या अधिकाऱ्यांकडूनही संबंधित ठिकाणाची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली नसल्याचे एमपीसीबीच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे.