पुणे – करोना प्रतिबंधित लसीकरणाचे दोन डोस घेतलेल्या नागरिकांसाठी उद्याने सुरू करा, अशी मागणी नगरसेवक आदित्य माळवे यांनी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्याकडे केली आहे.
करोना रुग्णांची संख्या वाढली आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील उद्याने बंद करण्यात आली आहेत. मात्र, सिनेमागृहे आणि मॉल सुरू असून, तेथे लसीकरणाचे दोन डोस घेतलेल्यांना प्रवेश देण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील उद्याने खुली करावीत.
लसीकरणाचे दोन डोस घेतलेल्या नागरिकांना उद्यानात प्रवेश द्यावा, या मागणीचे निवेदन माळवे यांनी महापौरांना दिले आहे.