लॉन्स, मंगल कार्यालये 50 टक्के क्षमतेने सुरू करण्यास परवानगी द्या!

व्यावसायिकांची मागणी : देखभाल दुरूस्ती खर्चही निघेना

पुणे – करोनामुळे सुमारे सहा महिन्यांपासून शहरातील लॉन्स आणि मंगल कार्यालये आहेत. त्यामुळे देखभाल दुरुस्ती खर्च, वीज, कामगारांचा पगार, पाणीपट्टी हा सगळा खर्च खिशातून करावा लागत आहे. आणखी काही काळ लॉन्स आणि मंगल कार्यालये सुरू न झाल्यास अनेकांना नाईलाजास्तव हे व्यवसाय बंद करावे लागतील. त्यामुळे शासन 50 टक्के क्षमतेने लॉन्स आणि मंगल कार्यालये चालकांनी शनिवारी पत्रकार परिषदेत केली.

यावेळी यश लॉन्सचे अविनाश कोठारी आणि श्रीपाल ओसवाल, श्रीजी लॉन्सचे अशोक शहा, तालेरा गॉर्डनचे सुभाष तालेरा, रोहि व्हिला पॅलेसचे मोहित पिंगळे, समीर काथुरे, बिपेन शहा, दि पुना मर्चंटस चेंबरचे अध्यक्ष पोपटलाल ओस्तवाल, राहूल ओस्तवाल आदी उपस्थित होते.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.